टॉप बातम्या

महावितरण कंपनीने दर महिन्याला रिडींग घेऊन ग्राहकांना न्याय द्यावा - मनसेची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : महावितरण कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक व अधिकाऱ्यांकडून होत असलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार थांबविण्यात यावा, अशा आशयचे निवेदन काल (ता.6 फेब्रु.) रोज बुधवारला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव शाखेच्या वतीने मारेगाव महावितरणचे उपअभियंता यांना देण्यात आले.

निवेदनात पुढे असेंही म्हटलं की, वीज वितरणकडे मनुष्यबळ कमी असल्याने वितरण कंपनी ग्राहकाकडील मिटर रिडींग घेण्याचे काम खासगी कंपनीला देते. ज्यांनी हे टेंडर घेतलेले असते ती कंपनी गरजेपेक्षा कमी कर्मचारी कामावर ठेवतात. परिणामी सर्व ग्राहकांचे दर महिन्याला रिडींग होत नाही. त्यामुळे ग्राहकांना नियमित बिले देऊन व रिडींग दरमहिन्याला ग्राहकाना न्याय द्यावा,अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांची मागणी  आहे.

येत्या सात दिवसात सर्व मागण्या मार्गी लावाव्या, अन्यथा तीव्र स्वरुपात आंदोलन छेडण्यात, येईल असा ईशारीही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषभाऊ रोगे, तालुका अध्यक्ष रुपेशभाऊ ढोके, ता. उपाध्यक्ष उदयभाऊ खिरटकर, ता. संघटक नबीभाई शेख आदींची उपस्थिती होती.


ग्राहकांना चुकीची वीज बिले गेली असतील तर तत्काळ दुरुस्त करून देण्यात येतील.रिडींग एजन्सी ला चुकीची रिडींग न घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. घेतल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

-शैलेशकुमार पाटील
उपअभियंता महावितरण कार्यालय, मारेगाव
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();