टॉप बातम्या

आज मारेगावत राष्ट्रीय सुरक्षा दीन

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

मारेगाव : भारत सरकारच्या आदेशान्वये सर्व खाजगी व सरकारी विद्युत क्षेत्रातील लाईनमनच्या सेवेची दखल घेऊन त्यांच्या कामाप्रती संवेदना व्यक्त करण्याकरिता आज 4 मार्च हा दिवस 'लाईनमन दिवस' मानून राष्ट्रीय सुरक्षा दिन रॅली मारेगावात काढण्यात आली. 

मारेगाव महावितरण कंपनी च्या वतीने शहराच्या मुख्य रस्त्याने रॅली सकाळी ठिक 10.00 वाजता निघाली. दरम्यान, शहरातून सुरक्षिततेची माहिती देऊन 11.15 ला परत ही रॅली आली. या रॅली मध्ये अधिकारी कर्मचारी, महिला कर्मचारी सहभागी झाले होते.

या अनुषंगाने मारेगाव उपविभागामार्फत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आज सायंकाळी 7 वाजता उपविभागीय कार्यालय महावितरण मारेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती उपअभियंता शैलेशकुमार पाटील यांनी दिली. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();