टॉप बातम्या

नरसाळा येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथे काल दिनांक 12 मार्च 2024 रोज मंगळवारला क्रांतिवीर बाबुराव पुल्लेशूर शेडमाके यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी 7.30 वाजता सुमारास गावातील आदिवासी जनजागृती युवा संघटना यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष : लक्ष्मण भाऊ कनाके यांनी बस स्टॉप जवळील बाबुराव शेडमाके प्रतिमा फलक या ठिकाणी गावातील सरपंच, संगीत मरस्कोले व पाहुणे म्हणून लाभलेले मंडाले सर यांनी सुद्धा क्रांतिवीर बाबुराव पुल्लेशूर शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन केले व तसेच संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण भाऊ कनाके यांनी समाजाला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा जीवन प्रवास यांच्या विषयी समाजाला आणि युवा पिढीला सांगितले की, त्यांचा इतिहास वाचा आणि तो आत्मसात करा असे खूप मोलाचे मार्गदर्शन केले व त्यावेळी गावातील आदिवासी जनजागृती युवा कार्यकत्ते व विरांगना राणी दुर्गावती महिला संघटना तसेच गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();