टॉप बातम्या

शिवजयंती मोठ्या उत्साहात पिसगांव येथे साजरी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील पिसगांव येथे काल दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोज सोमवार ला रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.

सायंकाळी 6:30 वाजता सुमारास शिवराय मित्र परिवार यांच्या वतीने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन केले, दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोष एकत्रितपणे सर्वत्र निनादला.

या वेळी गावातील शिवभक्त युवा कार्यकत्ते व महिला मंडळ तसेच गावातील जेष्ठ नागरिक, तथा युवक युवती व बाल गोपाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post