मारेगाव पंचायत समिती सभागृहात हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

  
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील पंचायत समिती मधील महिला कर्मचारी आणि ग्रामपंचायत महिला तसेच सचिव महिला यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात समस्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील तसेच पंचायत समितीतील येणाऱ्या महिला लाभार्थी त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण विभागाच्या कर्मचारी महिला आरोग्य विभागातील महिला कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सार्वजनिकरित्या हळदी कुंकवाचे महत्व प्रास्ताविकामध्ये विद्यामत्ते मॅडम यांनी महत्त्व पटवून दिले. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित त्याची महिला प्रति असलेले काम शिक्षण या सर्व बाबीचा उल्लेख प्रास्ताविकामध्ये विद्या मॅडम यांनी समजून सांगितले. यानिमित्ताने विविध कलागुणांना वाव देण्यात आला. त्याचप्रमाणे मून मॅडम यांनी ज्योती सावित्री जीवनावर आधारित सुंदर गीत सादर केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोलाचे योगदान उईके मॅडम, पाटील मॅडम, रेवतकर मॅडम, धुर्वे मॅडम, रासेकर मॅडम व इतर महिला कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
महिलांमध्ये जनजागृती, उन्नती, महिला संघटन, महिला सक्षमीकरण, बळकटीकरण, महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व थाटा साजरा केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राठोड मॅडम यांनी केले.