वणीत एक दिवसीय 'महाराष्ट्र ट्रायबल आघाडी' पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महाराष्ट्र ट्रायबल आघाडी पार्टी च्या वतीने रविवार दि. १४ जानेवारी २०२४ ला येथील शेतकरी मंदिर परिसरात नानासाहेब गोहोकार सभागृहामध्ये एक दिवसीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी अॅड. संतोष भादिकर (म.ट्रा.आ.चे राष्ट्रीय उपाध्यक्ष) होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. बबन पेंदोर, यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री. सुमित गेडाम, गडचिरोली जिल्हाचे कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. विजय गेडाम व वणी शहराध्यक्ष श्री रमेश मडावी उपस्थित होते. महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे राष्ट्रीय संघटक श्री. संतोष चांदेकर यांनी प्रास्ताविक मध्ये पक्षाचे ध्येय धोरणे प्रखरतेने मांडून ती उपयुक्त अशी पटवून सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे वणी तालुकाध्यक्ष श्री. प्रदीप जुमनाके यांनी केले.

महाराष्ट्र ट्रायबल आघाडी (पार्टी) च्या मेळाव्यात आदिवासी समाजातील अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाज प्रबोधन केले. आदिवासी सामाजिक व राजकिय अस्तित्व निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र ट्रायबल आघाडी (पार्टी) ची आजच्या काळात नितांत आवश्यकता आहे व आदिवासी बांधवांनी प्रामाणिकपणे महाराष्ट्र ट्रायबल आघाडी ला सहकार्य करावे व पक्षात देखील प्रवेश करावा असे आवाहन केले. त्यामध्ये प्रामुख्याने श्री. रामदास गेडाम, श्री. भाऊराव आत्राम, श्री. श्रीकृष्ण मडावी, श्रीमती रजनी पोयाम, रंजना राजगडकर, श्री. दिलीप पेंदोर, श्री. रमेश गेडाम, श्री. सुदाम गावंडे(वणी तालुका प्रचारक) श्री. निशांत आत्राम (राजुरा विधानसभा अध्यक्ष), श्री. विनोद सिडाम (राळेगाव तालुकाध्यक्ष), श्री. संजय मेश्राम (झरीजामणी तालुका संघटक) इत्यादी. यांनी मनोगत व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणामध्ये अॅड. संतोष भादिकर यांनी महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींनी एकत्र येऊन महाराष्ट्रात आदिवासींचे स्वतंत्र सामाजिक व राजकिय अस्तित्व निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र ट्रायबल आघाडीला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.