सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून अवैध धंदे सुरू असल्याबाबतची तक्रार मारेगाव तालुका भाजपा शाखेच्या वतीने ठाणेदार यांना करण्यात आली होती. अवैध धंदे सुरुच असल्याची कार्यकर्त्यांची तक्रार असताना पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांच्याशी भेट घेत मारेगांव तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचा सक्त आदेश दिला.
यावेळी विद्यमान आमदारांनी तालुक्यातील कोसारा येथे सुरु असलेल्या अवैध कोळसाबाबत ठाणेदार यांना खडेबाल सुनावत यात प्रामुख्याने अवैध धंदे, मटका, जुगार, कोंबड बाजार, अवैध दारू विक्री, गोधन तस्करी, या संपूर्ण अवैध धंद्याबाबत सविस्तर चर्चा केली. हे सर्व प्रकार मला तत्काळ बंद पाहिजे, असा दमही भरला. दरम्यान, ठाणेदार यांनी येत्या दोन ते तिन दिवसात सर्व अवैध धंदे बंद करण्यात येईल असे आश्वासन दिले. नुकतेच मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरफोडी झाल्या. याची नागरिकांना चांगलीच धास्ती मनात शिरल्याने मारेगाव शहराचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आमदारांनी तत्काळ मारेगांव पोलीस स्टेशन गाठून दि.14 सप्टेंबर ला अंदाजे 14 ते 17 घरे शहरातील फोडल्याने या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी ते आले असता त्याबाबत संपूर्ण चर्चा करून आमदार बोदकुरवार यांनी ठाणेदार खंडेराव यांना कडक आदेश दिले अशी माहिती आहे.
मारेगाव तालुक्यातील अवैध धंद्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील वातावरण कलूषित होत असून अशा घटनांना मार्ग सुकर होतो. त्यामुळे तालुक्यातील अवैध धंदे बंद करा अशी आग्रही मागणी कार्यकत्यांनी लावून धरल्याने ठाणेदार यांना सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर ठाणेदार खंडेराव यांनी सर्व धंदे बंद करण्यात येईल व सदरील घरफोडीचे गुन्हेगार 8 ते 10 दिवसांत पकडण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी तालुका मारेगांव भाजपा शाखेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वरजी चिकटे, जेष्ठ कार्यकर्ते दिनकरराव पावडे, जेष्ठ कार्यकर्ते शशिकांत आंबटकर, भाजपा शहर युवामोर्चा अध्यक्ष अनुप महाकुलकर, भाजपा शहर युवामोर्चा सरचिटणीस रविंद्र टोंगे, कॉटन मार्केट संचालक भाजपा अविनाशभाऊ लांबट, नगरसेवक राहुल राठोड, नगरसेवक वैभव पवार, भाजपा युवामोर्चा महामंत्री विनोद ठावरी तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
मारेगांव तालुक्यातील तत्काळ अवैध धंदे बंद करा; ठाणेदारांनी दिले आश्वासन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 16, 2023
Rating:
