टॉप बातम्या

संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करा - सुनील देवूळकर

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील गोंडबरांडा येथील सार्वत्रिक ग्राम पंचायत निवडणूक सन 2013-2018 या वर्षी झालेल्या याद्या व 2023 होऊ घातलेल्या निवडणुकीच्या मतदार यादी प्रत अर्जंद्वारे मागवली. मात्र, तहसील कार्यालय अर्जदाराच्या अर्जाला केराची टोपली दाखवत असल्यामुळे तहसीलदार निलावाड यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील सुनील हरिश्चंद्र देवूळकर यांनी 22/08/2023 रोजी तहसील कार्यालय मारेगाव येथे मतदार याद्या मिळण्याकरिता अर्ज सादर केला होता. याला आता वीस ते बावीस दिवस लोटली असून सुद्धा त्यांना मतदार याद्या मिळाल्या नाहीत अशी अर्जदाराची तक्रार आहे. निवेदनात नमूद प्रमाणे, शासकीय नियमानुसार सदर दस्तऐवज हे 8 दिवसाच्या आत देणे अनिवार्य आहे, तरी सुद्धा तहसील कार्यलयाने त्यांना मतदार यादी दिली नाही. विलंब का होत आहे या बाबत अर्जदार सुनील देवूळकर यांनी संबंधित नायब तहसीलदार निवडणूक अधिकारी यादव व मडावी मॅडम, आत्राम साहेब, पेंदाणे यांना 7 दिवसानंतर भेट घेतली असता त्यांच्या कडून उडवा उडवीचे उत्तर दिले व कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही. शिवाय सदर माहिती या कार्यालयात उपलब्ध नाही असे सांगितले. दरम्यान, देवूळकरांनी लेखी स्वरूपातही मागितले असता कर्मचाऱ्यांनी लेखी सुद्धा दिले नाही. उलट "तुला कोणाकडे जायचे ते जा आम्ही माहिती देत नाही" असे सांगून त्यांना हाकलून लावले,असा आरोप त्यांनी निवेदनातून केला आहे. आज दि.12 सप्टेंबर, मंगळवार रोजी परत त्यांनी भेट घेऊन याद्या मागितल्या, परंतु आजही त्यांना खाली हाताने परतावे लागले.
त्यामळे नमूद बाबीची योग्य ती चौकशी करून संबंधित कार्यालयातील दोषी वर शिस्तभंगाची कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी दिलेल्या निवेदनातून तहसीलदार निलावाड यांच्या मार्फत वणी उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यवतमाळ यांना करण्यात आली आहे. 

त्यामुळे सदर अर्जदाराच्या मागणीकडे तहसील कार्यालय दुर्लक्ष करतात की, जातीने लक्ष देऊन त्यांना माहिती पुरवतात. व संबंधितावर कार्यवाहीचा बडगा उगारतात का, आता याकडे अख्ख्या तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आपल्या तहसील कार्यालयाला याद्या प्राप्त नसल्यामुळे त्यांना सन 2013-2018 ह्या वर्षी झालेल्या निवडणूक मतदार याद्या त्यांना देता आल्या नाहीत, तरी सुद्धा अर्जाप्रमाणे याद्या शोधून अर्जदारांना मतदार याद्या एक दोन दिवसामध्ये देण्यात येईल, जर नसेलच तर त्यांना उपलब्ध नसल्याचे प्रमाण पत्र देण्यात येईल. मात्र कार्यालयाकडून त्यांनी केलेल्या तक्रारीप्रमाणे असं काहीही नाही. त्यांचा आरोप निरर्थक आहे.

-के.बि.यादव
नायब तहसीलदार,निवडणूक अधिकारी तहसील कार्यालय मारेगाव


Previous Post Next Post