वणी: ब्लॅक डायमंड नगरीची दहीहंडी मुंबईच्या गोविंदांनी फोडली


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : येथील 'दहीहंडी' मुंबई च्या गोविंदा पथकाने फोडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून मनसे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. लोक कल्याणकारी नेता, पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या हस्ते दहीहंडी उत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी, यांची उपस्थिती होती. तसेच वणी विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, कार्यकारण सदस्य, पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी उपस्थित तरुणांशी संवाद साधून त्यांच्याबरोबर ए आर रहेमान यांच्या कार्यक्रमामध्ये असणारी डीजे सिस्टीमच्या तालावर नृत्य ठुमके लावले. शेवटी मुंबईच्या संघाने भव्य दिव्य थर रचत दहीहंडी फोडली. विजेत्यांना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते पक्षनेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस सह स्मृतिचिन्ह देण्यात आले. दरम्यान, सिनेतारकांच्या हजेरीत दहीहंडीचा थरार आणि जल्लोष वणी विधानसभा क्षेत्रातील लाखों नागरिकांनी अनुभवला आहे.
वणीच्या इतिहासात पहिल्यांदाच येथील नागरिकांसाठी दहीहंडी उत्सवाचे मनसे आयोजन करते. हे खरेच कौतुकास्पद आहे. त्यामुळे जनतेला मोकळ्या वातावरणात आनंद घेता येत आहे. राजू उंबरकर यांनी महिलांसाठी, तरुणांसाठी, शेतकऱ्यांना राबविलेले उपक्रम प्रशंसनीय आहेत, आमच्या मुंबईला लाजवेल इतका शिस्तबद्ध कार्यक्रम मी पहिल्यांदाच बघते आहे, असे मत मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी व्यक्त केले.
यावेळी वणी विधानसभा क्षेत्रातील तरुणांसाठी रोजगार मेळाव्याची (2023) मोठी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. पक्षनेते राजू उंबरकर यांनी सर्वांचे आभार मानले.