मारेगाव पाठोपाठ वणी विद्यानगरीत चार ठिकाणी घरफोडी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : वणी उपविभागीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घरफोडीचे प्रमाण वाढले असून यावर पोलिस प्रशासन सफसेल फेल ठरत असल्याची नागरिकांची ओरड आहे.

मारेगाव तालुक्यात पोळ्याच्या मध्यरात्री दहा ते बारा घर फोडून नागरिकात मोठी दहशत पसरली असताना वणी शहरालगत असलेल्या परिसरामध्ये चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरफोडी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात शहरालगत असलेल्या विद्यानगरी परिसरातील प्रकाश धुळे यांच्या घरी आज १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री तिन वाजताच्या सुमारास घरफोडीची घटना घडली. धुळे कुटुंबिय गाढ झोपेत असतांना अज्ञात चोरट्यांनी अंगणातील गेटचे कुलुप तोडून, स्वयंपाक घराच्या मागील दरवाज्यामधून आत शिरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, स्वयंपाक घरात ठोक-पिटीचा आवाज येत असल्याने धुळे कुटुंबियांच्या उरात धडकी भरली. मात्र, घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केल्याचे निदर्शनास येताच मोठ्याने परिवारातील सदस्यांनी आरडा ओरड करुण चोरट्यांना पळो की सळो करुण लावले. अशातच याच परिसरात राहणारे धनराज डवरे हे पोळा सण साजरा करण्यासाठी ते बाहेरगावी गेले असता घरी कोणीच नसल्याचे हेरून त्यांच्या सुद्धा घरी चोरट्यांनी डाव साधत घरातील वस्तूची फेकफाक करुन, साहित्याची तोडफोड केली. तर असाच काहीसा प्रकार विद्यानगरी लगत नविन झालेल्या द्वारका नगरी मध्येही उघडकीस आला. या घटनेने पोलीस प्रशासनावर सर्व सामान्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वणी उपविभागीय क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस प्रशासन आहे की नाही? असा सवालही केला जात आहे. कुंभकर्णी झोपेत असलेल्या पोलिस प्रशासनाला जाग कधी येणार? असा प्रश्न नागरीकाकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे विद्या नगरी परिसरामध्ये गस्ती पथकांनी लक्ष ठेवावे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

मागील वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात घरफोड्या झाल्या असून पोलिस प्रशासन यावर वचक ठेवण्यास सपशेल अपयशी झाले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या गंभीर बाबीकडे विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. 
मारेगाव पाठोपाठ वणी विद्यानगरीत चार ठिकाणी घरफोडी मारेगाव पाठोपाठ वणी विद्यानगरीत चार ठिकाणी घरफोडी Reviewed by सह्याद्री चौफेर on September 16, 2023 Rating: 5
Powered by Blogger.