सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव तालुक्याची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. मारेगाव शहराध्यक्षपदी चांद बहादे, शहर संघटकपदी नबी शेख तर रुपेश ढोके यांची तालुका अध्यक्ष पदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मनसे (कुंभा विभाग अध्यक्ष व मार्डी विभाग अध्यक्ष) पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात कुंभा विभाग अध्यक्ष पदी आदित्य बुच्चे तर मार्डी विभाग अध्यक्ष रोहित हस्ते यांची सर्वानुमते निवड झाली आहे. दरम्यान, नवनियुक्त कार्यकारिणीचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनसे हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पक्षाला आता भरारी देण्यासाठी तरुणाईला जिंकण्यासोबत जनतेच्या न्याय हक्का साठी लढण्याची गरज आहे. यावेळी नियुक्ती सभेला पक्ष नेते राजू उंबरकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, धनंजय त्रंबके, शिवराज पेचे, फाल्गुण गौरकार, आदीं उपस्थित होते.