टाकरखेडा येथे मजुराने घेतला गळाफास

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्याच्या 3 किमी अंतरावर असलेल्या टाकरखेडा येथील एका इसमाने स्वघृही असलेल्या अंगणातील बकुळी च्या झाडाला दोरा च्या सहाय्याने गळाफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली. सदर घटना आज पहाटे चार ते पाच वाजता च्या दरम्यान घडली असा कयास आहे. ते मजूर म्हणून काम करायचे अशी माहिती आहे.

रमेश दादू भाटी (अंदाजे वय 75) रा. टाकरखेडा असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. ते अंगणातील बकुळीच्या झाडाला दोरा बांधून गळाफास घेतलेले सकाळी आढळून आले. रमेश याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याच्या पाठीमागे पत्नी, दोन मुल,  तीन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे. सदर घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

वृत्त लिहेपर्यंत संबंधित प्रशासन घटनास्थळी दाखल व्हायचे होते अशी माहिती आहे.