सह्याद्री चौफेर : वृत्तसंस्था
कुंभा, मारेगाव व मार्डी येथे पार पडलेल्या हजारो गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला, विशेष म्हणजे नागरिकांच्या मागणीला मान देऊन हे भव्य डोळ्यांचे साथ रोग शिबिराचे आयोजन केले गेले. आज शेवटचा टप्प्यात हे शिबीर पार पडत आहे, आज गुरुवार ला नवरगाव येथे डोळ्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नवरगाव येथे होणाऱ्या शिबिराचा लाभ गरजू जनतेनी घ्यावा असे, आवाहन सभापती गौरीशंकर खुराणा यांनी केले असून मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी चे तालुका अध्यक्ष यांच्या पुढाकारातून हे शिबीर आकाश बदकी, सय्यद समीर, अंकुश माफूर, आकाश भेले, शाहरुख शेख, प्रफुल विखणकर, समीर कुळमेथे, यांच्या नेतृत्वात संपन्न होत आहे.
कुंभा, मारेगाव, मार्डी व नवरगाव येथील शिबिराला स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांचे सुद्धा बहुमोलाचे सहकार्य लाभत आहे. असे मत तालुका काँग्रेस कमिटी च्या व्यक्त केले. असेच सहकार्य तालुक्यातील प्रत्येक स्थानिकांनी दिले तर, यापुढे ही जनहितार्थ सामाजिक उपक्रम राबवू असे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खुराणा यांनी मार्डी येथील पार पडलेल्या शिबिराला मार्गदर्शन करतांना म्हणाले.