सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : बऱ्याच प्रतीक्षे नंतर तालुक्यातील लाभार्थ्यांना रेती (वाळू) मिळणार आहे. आज गुरुवार ला कोसारा रेतीचा घाटाचा शुभारंभ पार पडला. याबाबत चे पत्र देण्यात आले, अशी माहिती आहे. तत्पूर्वी रेती मिळण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी लोकशाही चा मार्ग अवलंबून वाळू साठी मोर्चा, निवेदन सह आंदोलन केले, परंतु त्याचा फारसा काही उपयोग दिसून आलेला नाही. सर्व आपापल्या स्तरावर सेट होऊन मोकळे, अशी मध्यंतरी जोरदार चर्चा रंगली होती.
मागील कोरोना काळापासून रेती संबंधित व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे चुरी चा वापर करून अनेकांना आपलं काम भागवावं लागलं असले तरी, छुप्या मार्गाने रेती अव्याच्या सव्या दराने पुरवली जात होती, हे सर्वश्रुत आहे. मात्र शासनाचे सर्व सामान्यांना जाहीर केलेले धोरण कुचकामी ठरले, असे म्हणणं काही वावगं नाही.
स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देवू यासाठी मोठा गाजावाजा केला, परंतु कणभर रेती लाभार्थ्यांना मिळाली नाही. खास करून मारेगाव तालुक्यातील एकही लाभार्थ्यांना रेती मिळाली. अशी ओरड असतांना जवळपास 1036 लाभार्थ्यांनी नोंद प्रशासन दरबारी केली. मात्र, रेती मिळत नव्हती. या साठ्यातून ठेकेदार गब्बर झाले अशी ओरड जनतेतून ऐकायला मिळत होती.

पावसाळा सुरु झाला बांधकाम गुंडाळून घरी बसण्याची वेळ आली, घराचे स्वप्न रंगवणाऱ्याच्या आशेवर पाणी फेरलं गेलं आणि बऱ्याच कालावधी नंतर आज दि.10 ऑगस्ट रोजी शासन प्रशासनाला जाग आली व कोसारा रेती घाटाचा शुभारंभ आ. संजीव रेड्डी बोदकूरवार, तहसीलदार उत्तम निलावाड, सरपंच सौ. छायाताई खाडे व कोसारा ग्रामपंचायत पदाधिकारी तथा सदस्य गण तसेच ग्रामस्थांच्या, उपस्थित हा शुभारंभ पार पडला आहे. यावेळी मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व सरपंचा यांचे हस्ते रेतीचा शुभारंभ प्रसंगी हिरवी झेंडी दाखवण्यात आली. त्यामुळे लाभार्थ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या, आता मारेगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाची स्वस्त दरात रेती मिळणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी प्रशासनातील अधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तथा लाभार्थी यांची लाक्षनीय उपस्थिती होती.