टॉप बातम्या

मार्डीत भर चौकात घडला थरार: 22 वर्षीय युवकांवर कुऱ्हाडीने सपासप केले वार..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मार्डी येथील भर चौकात एका 22 वर्षीय युवकांवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करून ठार केल्याची ही थरकाप उडवणारी घटना एका पानटपरी च्या समोर मुख्य मार्गांवर सायंकाळी 8.45 वाजताच्या दरम्यान,घडली. 

आज बुधवार (09 ऑगस्ट) आठवडी बाजार, आणि परिसरातील नागरिकांची बाजार घेऊन परतीची वाटचाल. अशा गजबजलेल्या भर चौकात कुऱ्हाडीचे 15 ते 20 सपासप घाव घालून त्यास घायाळ केल्याची घटना घडल्याने मार्डीसह परिसरात एकच खळबळ उडाली.
कैलास उर्फ गोलू बंडू सयाम (22) रा.मजरा असे या प्राण घातक हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो एक महिन्याअगोदर कारागृहातून बाहेर आला असल्याचे समजते.तर आरोपी प्रदीप गोविंद भारशंकर (अंदाजे 36) रा. मार्डी (मुळ चा राजुरा कॉलरी ता. वणी) असे नाव आहे. दोघेही गुन्हेगारी प्रवृत्ती चे असल्याची चर्चा घटनास्थळावर नागरिकांतून दबक्या आवाजात ऐकावंयास मिळाली. भर चौकात घडलेल्या घटनास्थळी बघ्याची एकच गर्दी जमली होती. आरोपीने प्राणघातक हल्ला करून गळ्यावर,मानेवर कुऱ्हाडीने 'गत प्राण' होई पर्यंत वार करून त्याला घायाळ केले.
ऐन बाजाराच्या दिवशी रक्तरंजित घटना घडल्याने चौकातील व्यवसायिकांसह नागरिकात भीतीचे वातावरण काही काळनिर्माण झाले होते. या प्राणघातक हल्यातील मृतक हा जवळपास अर्धा तास घटनास्थळी धराशायी झाल्याची चर्चा ऐकीवात होती. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना स्थळाचा पंचनामा करून जखमीला तात्काळ ठाणेदार जनार्दन खंडेराव यांच्या टीमने उपचारासाठी वणी येथे हलवण्यात आले. मात्र, त्याचा उपचाराअंती मृत्यू झाला. घटनेतील आरोपी प्रदीप भारशंकर याला ताबडतोब अटक करून ताब्यात घेतले. 

या प्राणघातक हल्ल्याला किरकोळ वादाचे कारण ठरले जीवघेणे : 

सूत्राच्या माहितीनुसार मार्डी बुधवार बाजार होता, येथील चोपण मार्गांवरील दारू भट्टी च्या रस्त्यावरून जाऊ दे, हे किरकोळ कारण जीवघेणे ठरले. प्रदिपने रस्त्याच्या बाजूला होय म्हणत दोघात "तू तू मैं मैं" झाली. मृतकाने तू कोण बे म्हणत हुज्जत घातली आणि संतापलेल्या आरोपीने घरी जाऊन हातातली सायकल ठेवली व कुऱ्हाड घेऊन आला आणि मग रागाच्या भरात टपरी समोर भर चौकात उभा असलेल्या गोलू वर सपासप कुऱ्हाडीने गळ्यावर मानेवर वार केले. असे आरोपीने हसत मुखत पोलिसांना सांगितले. हा संपूर्ण थरार अंगाचा काटा उभा करणारा असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली मारेगाव ठाणेदार जनार्दन खंडेराव, यांचे चमू रमाकांत पाटील, अजय वाभीटकर अधिक तपास करित आहे.
Previous Post Next Post