सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : आज सकाळी सहा वाजता च्या दरम्यान, वृत्तपत्राच्या पार्सल कारला भीषण अपघात झाला असून, यात ओमनी कार चा दर्शनीभाग चेंदामेदा झाला आहे. या दुर्घटनेत तीन जन जागीच ठार तर, एक गंभीर जखमी झाले. असून ही राज्य महामार्गावर असलेल्या कोठोडा नजीक घडली. सदर ओमनी कार मारेगाव वरुण करंजीकडे जात होती असे समजते.
नागपूर वरून मराठी दैनिक वृत्तपत्र पार्सल घेऊन येणारी ओमनी कार क्रमांक एम एच 34 के 1954 ही आज सकाळी मारेगाव येथे वृत्तपत्र पार्सल देत पांढरकवडा कडे रवाना झाली.
राज्य महामार्ग असलेल्या कोठोडा जवळ विरुद्ध दिशेने येत असलेल्या भरधाव ट्रकने कार ला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा दर्शनीभाग चेंदामेदा झाला असून यातील चालक, वाहक व दोन प्रवासी पैकी एकूण तिघे जन जागीच ठार झाले. एक जन गंभीर जखमी असून त्याला पांढरकवडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, भीषण अपघात होताच ट्रक सह चालक पसार झाला. मृतकात कार चालक किशोर बोरकर रा.आनंद चौक वरोरा जिल्हा चंद्रपूर असल्याची माहिती आहे. उर्वरित मृतक व जखमीचे नाव कळू शकले नाही.
अपघाताची भीषणता एवढी भयावह आहे की, मृतक जबर धडकेच्या वाहनात फसलेले होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पांढरकवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.