टॉप बातम्या

एकीकडे भीषण अपघातात तर, दुसरीकडे गळाफास घेऊन युवकाची आत्महत्या, मारेगाव तालुका हादरला


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना तालुक्यातील नरसाळा येथील एका युवकाचा नागपूर येथे भाड्याने राहत असलेल्या खोलीत गळाफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून ही घटना आज शुक्रवार दि 23 जून रोजी उघडकीस आली.

सौरभ सुभाष मंजेकार (23) असे गळाफास घेतलेल्या युवकाचे नाव आसून तो कामाच्या शोधात नागपूरात भटकंती करायचा, अशातच एका कंपनीत कामाला लागला होता, मात्र आज त्याचा देह, गळाफास घेऊन आढळून आला.

तूर्तास युवकाच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नसून त्याचे पश्चात आई वडिल, दोन भाऊ असा आप्त परिवार आहे.
Previous Post Next Post