टॉप बातम्या

सिंधी येथील ग्रामस्थांनी 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा घेतला लाभ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : 'शासन आपल्या दारी' उपक्रम समाजातील सर्व तळागाळातील घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. या अभियानाचा नुकताच मारेगाव तालुक्यातील सिंधी येथे 9 जून 2023 रोजी शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंचा सौ निलिमाताई थेरे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून गटविकास अधिकारी मडावी साहेब, विस्तार अधिकारी जाधव साहेब, विस्तार अधिकारी मुनेश्वर साहेब, मंडळ अधिकारी आर. डी. कांडरकर, तलाठी चिकनकर, वानखेडे, शेख, उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक अविनाश भाऊ लांबट, इत्यादीसह विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

या उपक्रमातून जवळपास 501 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी, पशूसंवर्धन विभाग, पुरवठा विभाग, महसूल विभाग, सी एस सी सेंटर, पंचायत समिती समस्याचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, उत्तम आत्राम प्रभाकर चांदेकर, गणेश उराडे, दिलीप पचारे, तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रदीप डाहुले, दिनेश गेडाम, चंद्रशेखर ढवस,पोलीस पाटील यांचे सह ग्राम कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 
Previous Post Next Post