टॉप बातम्या

यवतमाळ येथे रोजगार हमी समितीची बैठक संपन्न


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

यवतमाळ : आज यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र विधीमंडळ रोजगार हमी समितीच्या ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान नियोजित दौऱ्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात समिती प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी आमदार सुधाकर अडबाले उपस्थित होते.

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना समितीच्या वतीने प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या. या पाहणीदरम्यान लाभार्थी व सामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि सूचनांची माहिती घेण्यात आली. तसेच कामांच्या गुणवत्तेचा, गतीचा आणि पारदर्शकतेचा आढावा घेण्यात आला.


या बैठकीत कृषी विभागातील योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसार व प्रचार करावा. पिकांबाबत योग्य मार्गदर्शन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना करावे, अशा सूचना बैठकीत दिल्या. तसेच दौऱ्यादरम्यान आढळलेल्या कामांच्या तृटीची आमदार सुधाकर अडबाले यांनी माहिती दिली.


यावेळी आमदार काशिनाथ दाते, आमदार शिरीषकुमार नाईक, आमदार संजय देरकर, आमदार आमश्या पाडवी, आमदार किशोर दराडे, आमदार बापू पठारे, आमदार किरण सरनाईक, आमदार राजेश बकाने, आमदार राजेश वानखडे, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक व जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.



Previous Post Next Post