सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
भारतीय नागरिकांमध्ये व तरूण पिढीमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी या हेतूने सर्व मारेगाव तालुक्यातील देशभक्तांच्या सहभागाव्दारे भारतीय नागरिक म्हणुन 14 ऑगस्ट ला सकाळी 10 वाजता "तिरंगा रॅली" काढण्यात येणार आहे.
मार्डी चौक येथून तिरंगा रॅली विविध मार्गांनी फिरून नगर पंचायत येथे परत येऊन समारोप होणार आहे.या रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.