नांदेपेरा येथील माहिलेचा सर्पदंशाने मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नांदेपेरा येथील 40 वर्षीय महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही दुःखद घटना आज दि 11 एप्रिल ला सकाळी सात वाजता च्या दरम्यान घडली.

विद्या संतोष केमेकर (40) असे सर्पदंशाने मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला आज सकाळी घर काम करत असताना घरात दडून बसलेल्या विषारी सापाने महिलेच्या हाताला चावा घेतला. विद्या अचानक दंशाने भेदारली असता, तिला नातेवाईकांनी सकाळी 7. वाजता वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान विद्याचा साडेसात वाजता मृत्यू झाला. 

मृतकाचे शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आल्या नंतर त्यांचे पार्थिवावर तीन वाजता अंत्यसंस्कार स्थानिक मोक्षधाम येथे करण्यात आले.

त्यांचे पश्चात पती, दोन मुलं असा आप्त परिवार आहे.