Top News

गरजवंत नागरिकांना आवश्यक कपड्यांचे मोफत वाटप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : समाजातील गोरगरीब, दिनदुबळ्या लोकांना मदतीचा हात दिला, त्यांना सहकार्य केले तर यातून जे आत्मिक समाधान मिळते ते समाधान वेगळेच असते. अशाच स्तुत्य उपक्रम लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाद्वारे प्रत्येक महिन्यात वणीतील गरजवंत नागरिकांना आवश्यक कपड्यांचे मोफत वाटप करण्यात आले. 

२५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२३ या १५ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कपडे गोळा करण्यात आले. यात महाविद्यालयाचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व वणी शहरातील अनेक नागरिकांनी आम्हाला कपडे आणून दिलेत, एक सामाजिक दायित्वाचा संदेशच त्यांनी आपल्या सहकार्याच्या माध्यमातून दाखवून दिला. मी कोणाच्या तरी कामी आलो ना त्याचे, कोणाला काय तरी दिल्याच आत्मिक समाधान मला मिळालं. असं सहकार्य करणाऱ्या व्यक्तींनी यावेळी मत व्यक्त केले.

अधिकांश जमा झालेल्या कपड्यांचे वाटप आज दि १२ मार्च २०२३ ला महाविद्यालयाच्या परिसरात सकाळी ९ ते १२ या दरम्यान करण्यात आले. जवळपास १७५ कपड्यांचे वाटप झाले. यावेळी अनेक गरजवंत नागरिकांचा भरगोस प्रतिसाद लाभला. या उपक्रमाकरिता राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जुनगरी यांनी पुढाकार घेतला तसेच डॉ गणेश माघाडे यांचे सहकार्य लाभले.

या उपक्रमामध्ये, धनश्री तेलंग, शेजल येसेकर, वैष्णवी निखाडे, अंकुश झाडे, करण ढुरके, साई दुधलकर, गौरव नायनवार या विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानाझोडे यांचे या उपक्रमाला मार्गदर्शन लाभले.
Previous Post Next Post