नवरगाव बंगाली डॉ.हाजरा लूटमार प्रकरणातील चार संशायित आरोपी अखेर मारेगाव पोलिसाच्या जाळ्यात

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : बंगाली डॉ.हाजरा यांना बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवत सोन्याचा ऐवज व रोख रक्कम लुटून पसार झालेल्या 4 संशायित आरोपींना सीमालगत तेलंगणा राज्यातील पोलीस स्टेशनमधून ताब्यात घेत त्यांना तब्बल 13 दिवसांनी अखेर मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये आणले.
      
13 मार्च 2023 रोजी चे रात्रीचे सुमारास मारेगांव येथील बंगाली डॉ. पोभास रविद्रनाथ हाजरा हे नवरगाव येथील आपला दवाखाना बंद करुन त्यांचे मोटार सायकलने मारेगाव स्थित घरी जात असतांना एका चारचाकी वाहनातून आलेल्या आरोपीतांनी आपले वाहन त्याच मोटार सायकल समोर लावून त्या चारचाकी वाहनातील तिन अनोळखी इसमांनी डॉ. हाजरा यांचे कानाला पिस्तुल लावून त्यांना गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले व त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचे अंगावरील सोन्याची अंगठी व मोत्याचा गोफ तसेच नगदी २४,००० रु असा एकूण ४५,०००/- रु चा मुददेमाल हिसकावून घेवून त्यांच सुटकेसाठी २५ लाखाची खंडणी मागीतली होती 

दरम्यान, या लूटमार प्रकरणानंतर काही लुटारूंनी तेलंगणा राज्यातही कंटेनरची चोरी केली होती. यात तब्बल सात संशायित आरोपींना इचोडा जिल्हा आदीलाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
    
मारेगाव,वणी पोलिसांसह यवतमाळ एलसीबीच्या पथकांनी तपासाची चक्रे अति जलद गतिने फिरवल्यानंतर तेलंगणा राज्यात संशायितांचा सुगावा लागला. इचोडा पोलीस स्टेशन प्रकरणाचा धागा पकडत मारेगाव पोलिसांनी संशय व्यक्त करीत पिसीआर संपल्यागत 7 पैकी 4 संशायितांना मारेगाव पोलिसांनी ताब्यात घेत मारेगाव ठाण्यात आज सकाळी 11.30 वाजता आणण्यात आले.
     
मारेगाव पोलिसांनी फिर्यादी यास तेलंगणा राज्यात जावून आरोपींची ओळख पटविण्यात आली होती. दरम्यान, इचोड पोलिसात संशायितांनी डॉ हाजरा लूटमार प्रकरणाचा गुन्हा ही कबूल केला नसल्याचे सांगण्यात येत आहे. 
सिनेस्टाईल थराराचा उलगडा संशायित आरोपीस आता मारेगाव खाकी'चा इंगा कसा या गंभीर प्रकरणाची नेमकी उकल होते याकडे अक्ख्या तालुक्याचे लक्ष वेधले आहे.
Previous Post Next Post