Page

मारेगावातील शेळ्या,वणी चोरट्यांना यवतमाळातून अटक

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : येथील टीनाच्या शेड मधून शेळ्या चोरून पसार झालेल्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने यवतमाळ येथून अटक केली. अवघ्या काही तासात या धडक कारवाईने तिघे आरोपी यवतमाळ पथकाच्या सहकार्याने मारेगाव ठाण्यात गजाआड आहे.
   
मारेगाव प्रभाग क्रमांक 3 मधील फिर्यादी संजय तुरारे (38) यांच्या मालकीच्या 3 नग शेळ्या दि.31 च्या पहाटे शेड मधून चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. तुरारे यांनी तात्काळ पोलिसात धाव घेत लक्षात आलेल्या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार दिली. शहरातील वाढत्या घटrनाक्रम लक्षात घेत मारेगाव पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरविली. दरम्यान यवतमाळ पथकाला या घटनेबाबत पाठपुरावा केला असता, वणी येथील तीन चोरट्यांनी मारेगावातून मध्यरात्री एका टीनाच्या शेड मधून कारच्या सहाय्याने शेळ्या चोरून पसार झालेली मारुती कार क्रमांक एम.एच.34 सी. 8501 या वाहनासह तिघे थेट यवतमाळात आढळून आले.

दरम्यान,पोलिसांची यंत्रणा चौफेर मागावर असतांना यवतमाळ स्थित मारुती कार सह शेळ्या व रिच रामदास वाटेकर (19) , सुजल अजय मोरे (19) व एक विधी संघर्ष बालक हे सर्व वणी येथील रहिवाशी असून या तिघांना अवघ्या काही तासात दुपारी यवतमाळातून अटक करण्यात आले.
 किमान 80 हजाराच्या मुद्देमाल सह आरोपींना मारेगाव ठाण्यात गजाआड करण्यात आले. जिल्हा अधीक्षक डॉ पवन बनसोड, वणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, मारेगाव ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आनंद अलचेवार, संजय वारेकर, अफजल पठाण, राजू टेकाम पुढील तपास करीत आहेत.