Page

जिल्हा परिषद वरिष्ठ शाळा कवठी येथे वर्ग सजावट स्पर्धा संपन्न...

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठी येथे विध्यार्थ्यांच्या कला, गुणांना वाव मिळावं याकरिता दिनांक ८/१२/२०२२ ला जिल्हा परिषद वरिष्ठ शाळा कवठी येथे सहशालेय उपक्रमाअंतर्गत वर्ग सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धा मध्ये वर्ग एक ते सात मधील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. वर्ग शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन घेऊन व आपल्या कल्पकतेने स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलाकृती, पारंपरीक खेळणी, विविध प्रकारची फ्फुले, उत्कृष्ट रंगरंगोटी, भौगोलिक साधने, उपकरणे यांची योग्य मांडणी करून स्वतःच्या वर्ग खोल्याची सुंदर सजावट करण्यात आले.
यावेळी परीक्षक तथा प्रमुख पाहुणे मनून गावचे सरपंच सौ. कांताबाई बोरकुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती सुधाकर श्रीकोंडावार, पो. पा. सचिन शिडाम, तंटामुक्त समिती अध्यक्ष टिकाराम म्हशाखेत्री, शाळा समिती सदस्य पद्माकर राऊत, यांनी भूमिका बजावली स्पर्धेला शाळेचे मुख्याध्यापक अनिल नैताम सर, सहाय्यक शिक्षक संतोष दलांजे सर, गुरुदेव कुळमेथे सर, मनोज आत्राम सर, गणेश सातेवार सर, खुशाल मांदाळे सर, प्रकाश वाकडे सर आदींची उपस्थिती होती.