शिवशक्ती वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी गजेंद्र घरत यांची तर यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी प्रशांत चंदनखेडे नियुक्त


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदावर गजेंद्र घरत यांची तर यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदावर प्रशांत चंदनखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवशक्ती वाहतूक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अली भाई यांच्या आदेशानुसार त्यांना हि नियुक्ती देण्यात आली आहे. शिवशक्ती वाहतूक सेना सरचिटणीस म्हणून मी सैय्यद रब्बानी चिश्ती त्यांना नियुक्ती पत्र देत आहे. त्यांची शिवशक्ती वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदांवर नियुक्ती करून त्यांना संघटनेशी निगडित कार्य करण्याची जबादारी देण्यात येत आहे. त्यांच्याकडून संघटनेचे पारदर्शक कार्य व्हावे अशी अपेक्षा बाळगून त्यांना पुढील वाटचालीकरिता आम्ही शुभेच्छा देत आहोत.

वाहतूकदारांवर होणारे अन्याय व त्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा तुम्ही सर्वोतपरी प्रयत्न कराल अशी आम्ही आशा बाळगतो. वाहन चालकांच्या समस्यांचं निराकरण करण्यात तुमचं महत्वपूर्ण योगदान राहावं ही आमची अपेक्षा आहे. वाहतूकदारांच्या न्याय व हक्कासाठी तुमच्याकडून प्रामाणिक प्रयत्न व्हावे तसेच इतरही समस्या सोडविण्यात तुम्ही पुढाकार घ्यावा हा उद्देश ठेऊन तुमची या महत्वपूर्ण पदांवर नियुक्ती करण्यात येत आहे. गजेंद्र घरत यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी तर प्रशांत चंदनखेडे यांची यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.