Page

वनोजा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला

सह्याद्री चौफेर | नितेश वनकर 

मारेगाव : संविधान दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. हेच औचित्य साधून मारेगाव तालुक्यातील वनोजा (देवी) येथे आंबेडकरी अनुयायी एकत्र येत संविधान दिन साजरा करण्यात आला. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नितेश वनकर, हरिदास नगराळे, प्रवीण पाटील, दिनेश नगराळे यासह आयुष्यमान आयुष्यमती उपस्थित होते.