सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही मुजोर ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणारे ट्रक चालक प्रशासनाला जुमानत नसल्याने त्रस्त ग्रामस्थांनी आज कांग्रेसच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन कोळसा भरलेले ओव्हरलोड ट्रक पोलीस ठाण्यात जमा केले. पुन्हा ओव्हरलोड ट्रक या मार्गाने आल्यास होणाऱ्या परिणामाला तयार राहा अशा इशारा देण्यात आला.
वरोरा तालुक्यातील एकोना कोळसा खदाणीमधून निघणारा कोळसा मोठया प्रमाणात वणी परिसरातील कोल वासरी मध्ये आणला जात आहे. या कोळस्याची वाहतूक खैरी वरून वडकी हायवे रोडने वणी अशा मार्ग ठरवून देण्यात आला आहे.
मात्र, ट्रक चालक डिझेल वाचविन्यासाठी खैरी वरून सरळ मार्डी मार्गे वणीला जात होते.ओव्हरलोड हा रस्ता खराब होत असल्याने दोन आठवड्या पूर्वी नांदेपेरा येथील लोकांनी आंदोलन करून ही वाहतूक बंद केली. परिणामी हे ट्रक चालक मार्डी मारेगाव रोडने जायला लागले.
अवघ्या आठ दिवसात या रोडची चाळण झाली. अनेकदा यासाठी तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. परंतु मुजोर ट्रक चालक जुमानायला तयार नाही.परिणामी आज भालेवाडी, पिसागाव,पांढरकवडा, देवाळा,वडगाव आदी गावातील नागरिकांनी कांग्रेस पुढाऱ्यांच्या नेतृत्वात या रोडने धावणारे चार ओव्हरलोड ट्रक पकडून मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन करीत पुन्हा या रोडवर ओव्हरलोड कोळसा ट्रक जाताना दिसले तर आम्ही आमच्या पद्धतीने अद्दल घडवू अशा इशारा दिला.
यावेळेस रवी पोटे,नंदेश्वर आसुटकर ,अंकुश माफुर,अनिल गेडाम,समीर कुडमेथे धीरज डांगाले, कपिल कुडमथेट गौरव आसेकर प्रमोद रिंगोले, राहुल चौधरी आदी कांग्रेसचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.