Top News

राजुर काॅलरी येथील महिलांचे आमरण उपोषणाला आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चा पाठींबा

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : दि.17 ऑक्टोबर पासुन राजुर (काॅलरी) येथील विविध मागण्या घेऊन वणी तहसील कायाॆलयासमोर महीलांचे आमरण उपोषण सूरू आहे. आज आमरण उपोषणाला पाच दिवस झाले तरी, प्रशासन दखल घेतांना दिसत नाही. आज आमरण हे अधिक तेज व्हावे, यासाठी अनेकांनी पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज आंदोलनात प्रत्यक्ष उडी घेतली, उपोषण कर्त्यांना भेटुन पाठींब्याचे पत्र दिले. दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार केला.

प्रशासनाला जागे करण्यासाठी पक्षाचे वतीने लवकरच राजुर ते वणी पैदल मार्च काढुन तहसीलसमोर ठिय्या देण्याची घोषणा केली. भाकपच्या सहभागाने उपस्थीत राजुरवासीयांमध्ये जोश निर्माण झाल्याने पुढे आंदोलन तेज होईल. दरम्यान, उपविभागीय अधिकारी डॉ. जावळे यांनाही निवेदन देण्यात आले. ह्यावेळी युवा शहर अध्यक्ष मनोज नारायण वाकटी, युवा तालुका अध्यक्ष हेमंत शंकर गावंडे, तालुका उपाध्यक्ष मुबीन शेख, संदेश तिखट, समिर भान्देकर, शुभम मुके, व   शाखेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post