वणी : मौजा मोहोर्ली येथील रहिवाशी असलेले भारत रामदास गौरकार (वय अंदाजे 48) वर्षे यांनी काल दि.21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8.30 वाजतचे दरम्यान, स्वतः चे राहते घरी विष प्राशन केले. यांना सर्वप्रथम वणी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. त्यांनतर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान काल रात्री अंदाजे 11 वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून भारत यांचे पश्चात आई, पत्नी, प्रांजली व अंजली ह्या दोन मुली आहेत.
मृतक यांचे शेतजमीन (सामाईक) शेती मोहोर्ली येथे असल्याची माहिती आहे.