टॉप बातम्या

पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ वणीत होणार दाखल?

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : येथील ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकांनी जमादारच्या कानखाली आवाज काढला असल्याची माहिती समोर आली असतांना वावड्या उठल्या होत्या. हे प्रकरण अधिक्षक यांच्या दारापर्यंत पोहचल्याने वणी ठाण्याचा गलथान कारभार पाहून थेट जिल्हा पोलीस अधिक्षक वणीत दाखल होत आहेत. कोण निलंबित होणार आणि उचलबांगडी कोणाची होणार? हे बघणे औचित्याचे ठरणार आहे.

गेल्या कित्येक महिन्यापासून वणी पोलीस ठाणे वादग्रस्त राहिले आहे. मोठमोठ्या गुन्ह्यात अनेकांनी आपले हात पिवळे केले आहे. कित्येक गुन्ह्याचा तपास प्रलंबित आहे. मात्र, पोलिसी खाक्या दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांनी उतमाज केला आहे. चक्क! गुरुवारी रात्री एका पोलीस उपनिरीक्षक असलेल्या अधिकाऱ्याने अमलदारच्या कानशिलात लावली आहे. म्हणजेच पोलीस जनतेच्या सेवेसाठी की,स्वतःच्या स्वार्थासाठी हे कोडेच आहे. तूर्तास याच पार्श्वभूमीवर वणीत जिल्हा पोलीस अधिक्षक येत असल्याची माहिती आहे. आता जिल्हा पोलीस अधिक्षक काय करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();