टॉप बातम्या

सदर मार्गांवरून अवजड वाहन नेण्यास मनाई आहे, अधिकाऱ्यांच्या आदेशाला ट्रान्सपोर्टरकडून केराची टोपली

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : नांदेपेरा मार्गाने होणाऱ्या अवजड वाहतूक संदर्भात विविध संघटनाकडून निवेदन देण्यात आली होती. यातच कॉ अनिल घाटे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना 27 सप्टेंबर 2022 आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता. याची दखल घेत या संदर्भाने दि.26 सप्टेंबर 2022 रोजी आमदार साहेब, ठाणेदार साहेब, तहसीलदार साहेब व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सोबत बैठक करण्यात आली. त्या मध्ये मा जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करण्यात आली, यात त्यांनी या समस्ये विषयी तत्परता दाखवली आणि 6/10 2022 पर्यंत वेळ मागितली, त्यामुळे आज दि.27 ला होणारे आंदोलन 6/10/2022 पर्यंत तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे कॉ अनिल घाटे यांनी सांगितले. जर 6 ऑक्टोबर पर्यंत तोडगा न निघाल्यास पुढील आंदोलनाची तारीख कळविण्यात येईल असेही कॉम्रेड घाटे म्हणाले. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();