टॉप बातम्या

भीषण आगीत कापड दुकान भष्मसात

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : शहरातील गजबजलेल्या बाजार पेठेतील भीषण आगीत कापड दुकान जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. ही घटना मध्यरात्री दोन अडीच च्या दरम्यान घडल्याचा कयास आहे.

 या भीषण आगीने रौद्ररूप धारण केल्याने वरोरा, पांढरकवडा येथून अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आल्यानंतर आगी वर पहाटे पर्यंत नियंत्रण आणण्यात आले. आग एवढी भीषण होती की, कापड दुकानातील विविध माल जळून भष्मसात झाल्याचे कळते.

ऐन सणासुदीच्या तोंडावर वणीतील मुख्य बाजार पेठेत असलेल्या प्रसिद्ध कापड शो रूम ला आग लागली. त्यामुळे सुविधा कापड केंद्र या व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();