Top News

सेवा नगरातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : येथील सेवा नगर परिसरात न.प.शाळा.क्र.8 जवळील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. नागपंचमी सणासुदीच्या दिवशी रात्री 8 वाजता च्या दरम्यान, उघडकीस आली.
सचिन बाबुलाल हारोडे (36) असे या मृतकाचे नाव आहे. त्याने राहते घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. तो मजुरीचे काम करीत होता. त्याच्या पत्नीने त्याला सोडचिठ्ठी दिल्याने तो एकटाच घरी राहत होता. 
मृतकाचे भाऊजी सचिन रामदास डांगोरे रा. वागधरा यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी मर्ग दाखल करून, मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.
सचिनच्या आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून, नेमकं स्पष्ट कारण पुढील तपासात निष्पन्न होणार आहे.

Previous Post Next Post