महागांव शहरात साहित्यसम्राट डाॅ. अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

लखन लोंढे | सह्याद्री चौफेर 

महागांव : महागांव शहरातील सटवाराव नाईक सभागृहात साहित्यसम्राट, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची आज १०२ वी जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.
      
आज दूपारी ठिक १ वाजता जयंतीच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. उमरखेड - महागांव विधानसभेचे विद्यमान आमदार नामदेव ससाने व सर्व मान्यवरांनी सर्व महापुरुष व डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन केले. तद्वनंतर मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.   

तसेच बालवक्ते कु. शुभांगी लोंढे हिच्या भाषणाने अण्णाभाऊंच्या विचारसत्राला प्रारंभ झाला. यावेळी नांदेडहून आलेले समाजातील युवा वक्ते शैलेश रणखांब यांनी आपल्या जोरदार क्रांतीकारी शैलीत बोलतांना म्हणाले की, मातंग समाजाने पूर्वीपासूनच काळानुरुप आपले महत्वपुर्ण स्थान निर्माण केले असुन भारताचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या कालखंडात मातंग ऋषींचा धार्मिक उल्लेख आढळतो तर आधूनिक काळात साहित्यरत्नाच्या रुपाने अण्णाभाऊ आदर्शवत झाले. त्याचप्रमाणे नियोजित वक्ते प्रा.डाॅ. बाळकृष्ण सरकटे, प्रा.देवेंद्र ठाकरे, माधव वैद्य (सेवानिवृत्त उपायुक्त, समाजक्याण) विजय रणखांब यांनी अण्णाभाऊंच्या जीवनावर अभ्यासपुर्ण प्रकाश टाकला आणि शेवटी विद्यमान आमदार नामदेव ससाने यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, अण्णाभाऊंचा आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने आदर्श घेतला पाहिजे असा त्यांनी राष्ट्रीय विचार मांडला.    

यावेळी दिपक आडे (भाजपा तालुका अध्यक्ष), सुदाम खंदारे (शिवसेना नेते), सुरेश नरवाडे (न.पं. उपनगराध्यक्ष, महागांव), गजानन वाघमारे (पत्रकार), संतोष कांबळे, अ‍ॅड. लक्ष्मीकांत भांगे, शिवानंद राठोड (उपसरपंच, चिली) तालुका उत्सव समितीचे प्रसाद शिंदे, दिपक लोंढे, प्रभाकर खंदारे, राजू कावडे, शिवाजी लोंढे, सुभाष पतंगे, देवराव घड्याळे, निलेश खंदारे, प्रभाकर अडलुरे, आनंदराव गरडे व लखन लोंढे (पत्रकार) मान्यवरांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपसथित होते.
Previous Post Next Post