कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
चंद्रपूर : महाराष्ट्र तसेच प्रामुख्याने विदर्भात गाजत असलेला कलकाम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज घोटाळाल्यातील संचालक, कार्यालयीन विदर्भ प्रमुखावर कठोर कार्यवाही करून त्यांना गजाआड करा अशी मागणी आज शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष चंद्रपूर निमेश मानकर यांच्या नेतृत्वात भेट घेऊन माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना करण्यात आली.
सदर प्रकरणाची तक्रार माजी गृहमंत्री मा.दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे साहेब, मा. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे करण्यात आलेली होती. मा.गृहमंत्र्यांनी स्पेशल स्क्वाड नेमून चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिलेले होते. परंतु मागील एक महिन्यापासून महाराष्ट्र आणि विदर्भात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे, संपूर्ण सरकारी यंत्रणा गुंतून होती. त्यामुळे या प्रकरणाकडे विशेष लक्ष देता आले, परंतु आता सदर प्रकरण गतिमान करू असे आश्र्वासन पोलिस अधीक्षकानी दिले.
निवेदनात सदर प्रकरणात फरार आरोपी विजय येरगुडे याला पकडावे तसेच कंपनीचे मुख्य संचालक विष्णू पांडुरंग दळवी व त्यांच्या सहकार्यावर आतापर्यंत कुठल्याच प्रकारची कार्यवाही झाली नाही.त्यामुळे त्या दिशेने तपास करून त्यांना सुद्धा गजआड करावे आणि आणि पीडिताना न्याय द्यावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन सदर प्रकरणात उचित कार्यवाही करण्यात संदर्भात विनंती करण्यात आली. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी MPID ॲक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती मागवून उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष निमेश मानकर तसेच पीडित आदी उपस्थित होते.