Top News

चोपण येथील शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल; विष प्राशन करून केली आत्महत्या!


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : सतत होणाऱ्या संततधार पावसाने शेतातील पिकाची दयनीय अवस्था पाहून असाह्य झालेल्या चोपण येथील एका शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आज 25 जुलै रोजी घडली.       

गजानन उर्फ सुरेश लहूदास खिरटकर (45) वर्ष असे विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मौजा चोपण येथील गजानन खिरटकर यांचे नऊ एकर शेती आहे. यावर्षी अतिवृष्टी झाल्याने पिकाची अवस्था बिकट झाली. त्यामुळे सतत विवंचनेत असलेल्या गजानन या शेतकऱ्याने आज रोजी सकाळी 10.30 वाजता आपल्या राहत्या घरी किटकनाशक प्राशन केले. मारेगाव येथे उपचारासाठी त्याला नेले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचे पाठीमागे पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.
Previous Post Next Post