कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
यवतमाळ : यवतमाळ जिल्हा हा ओलादुष्काळ जाहीर करुन सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशा अशायाचे निवेदन आर्णी-केळापूर विधानसभेचे माजी आमदार प्रा. राजुभाऊ तोडसाम तथा राष्ट्रवादी काँग्रेस आदीवासी सेलचे राज्य प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.25 जुलै 2022 ला अप्पर जिल्हाधिकारी व्हराडे साहेब, यांना देण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण जिल्हा अतिवृष्टी ग्रस्त झालेला आहे. खासकरून तालुक्यातील नदी काठावरील व नाल्यालगत असलेल्या सर्व शेतजमीन खरडून गेल्याने हजारो हेक्टर वरील शेतातील उभे पीक पूर्णतः उध्वस्त झाले.तसेच अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने हजारो घरांचे सुध्दा अतोनात नुकसान झाले.
या अनुषंगाने यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावे. व शेतकऱ्यांना 50 हजार रुपये तत्काळ आर्थिक मदत करावी. या प्रमुख मागणीसाठी आर्णी-केळापूर विधानसभेचे माजी आमदार प्रा. राजुभाऊ तोडसाम सोबतच निमिषभाऊ मानकर जिल्हा परिषद सदस्य तथा माजी बांधकाम सभापती, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ कानारकर, यवतमाळ शहराध्यक्ष पंकजभाऊ मुंदे, दादाराव राठोड (जिल्हा उपाध्यक्ष), लालसिंग राठोड (जिल्हा उपाध्यक्ष), सुरेशभाऊ मेश्राम (उपसभापती), नंदकिशोर पंडित (तालुका सरचिटणीस), विजयभाऊ तेलंगे (तालुका अध्यक्ष), जावेदभाई सैय्यद (अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष), आकाश येवले (युवक तालुका अध्यक्ष), पंकजभाऊ राठोड (तालुका सरचिटणीस), बंडूभाऊ तोडसाम (आदिवासी सेलचे तालुका अध्यक्ष), रमेश धुर्वे माजी (उपसभापती), कृषभाऊ पेंडपवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.