रवि घुमे | सह्याद्री चौफेर
चिंचमंडळ येथील मच्छिमारांचे उपजीविकेचे असलेले साधन या पुरात वाहून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असून उपजीविकेचे साधन च नसल्याने शासनाने शेतकऱ्यांप्रमाणे भोई बांधवाना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील भोई समाजाचे तालुका प्रमुख यांनी केली आहे.
या महापुरात मच्छिमारांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. पारंपरिक मासेमारीचे जाळे व न्हाव (डोंगा) घेत भोई बांधव
आपली उपजीविका करतात, मात्र मागील दहा ते बारा दिवसापासून संततधार पावसाने तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा घातला, त्यात भोई बांधवाचे उप जीविकेचे साधन पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांच्या वर पुढं जगायचं कसं असा प्रश्न उभा ठाकल्याने त्यांना किमान प्रत्येकी 50,000/- हजारांची मदत करावी अशी रास्त मागणी आहे.
सध्या तालुक्यात पावसाचे थैमान आहे. तलाव, नदीत ओसंडून पाणी भरून वाहत आहे. पुरामुळे जगण्याचे साधन वाहून गेल्याने मच्छिमारांना उपजिविकेचे साधन उपलब्ध नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. हे लक्षात घेवून तालुका प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकार ने मच्छिमारांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या प्रसंगी मारेगाव तालुका प्रमुख अतुल पचारे यांच्या नेतृत्वात संजय मांढरे, मदन शिवरकर, अशोक शिवरकर, सुभाष शिवरकर, महादेव पचारे, गजानन पचारे, श्रीराम मांढरे, गणेश मांढरे, रवींद्र मांढरे, यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.