विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव :मारेगाव तालुका अतिवृष्टीग्रस्त घोषीत करून ओला दुष्काळ जाहीर करा व पूरग्रस्त भागातील यथोचित सर्व करून विशेष अनुदान जाहीर करा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची तत्काळ आर्थिक मदत करा.या प्रमुख मागणीचे निवेदन मारेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.
तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.संपूर्ण तालुका अतिवृष्टी ग्रस्त झालेला आहे.खासकरून तालुक्यातील मार्डी- कुंभा विभागातील वर्धा नदी काठावरील व नाल्यालगत असलेल्या सर्व शेतजमीन खरडून गेल्याने हजारो हेक्टर वरील शेतातील उभे पीक पूर्णतः उध्वस्त झाले.तसेच अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने हजारो घरांचे सुध्दा अतोनात नुकसान झाले.
या अनुषंगाने तालुक्यातील नुकसानग्रस्त शेजमिनीचे सर्व करून विशेष अनुदान जाहीर करावे.व शेतकऱ्यांना 50 हजार रुपये तत्काळ आर्थिक मदत करावी.या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले.
यावेळी सेनेचे तालुका प्रमुख तथा प.स.उपसभापती संजय आवारी, नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, युवा सेनेचे तालुका प्रमुख मयुर ठाकरे, तालुका संघटक सुनील गेडाम, शहर प्रमुख अभय चौधरी, सुभाष बदकी, गजानन ठाकरे, दुमदेव बेलेकर, संजय लांबट, चंद्रशेखर थेरे, गणेश आसुटकर, पंकज नेहारे, जीवन काळे, गुरुदास घोटेकर, मनोज वाढफळे, ब्रम्हदेव जूनगरी आदी शिवसैनिक व युवा सैनीक उपस्थित होते.