वणी उपविभागातील पूर बुडाईमुळे झालेल्या नुकसान ग्रस्ताना तात्काळ नुकसान भरपाई द्या

राजविलास किनाके | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : तालुक्यात मागील सात ते आठ दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली. अशातच बेंबळा चे पाणी नदी पात्रात सोडण्यात आल्यानंतर तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले, लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरून  घरातील अन्नाचा कण वाहून गेला. या दरम्यान वर्धा नदी किनारी असणाऱ्या गावांना पुराचा जबर फटका बसला. यात हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली व शेती खरडून नेली. त्यामुळे पूर पीडितांना आता सरसकट मदतीची गरज आहे.
मारेगाव तालुक्यातील शिवणी, दांडगाव, कोसारा, चिंचमंडळ, वनोजा, मुकटा, आपटी यासह इतरही परिसरांना पुराचा फटका सोसावा लागला असतांना वणी तालुक्यातील सेलू, सावंगी, कवडशी, कोना, रांगना, भुरकी, झोला या सह इतर ही गाव प्रभावित झाली आहे. त्यामुळे उपविभागातील तात्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्ताना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे असे साकडे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसुटकर यांना घातले. 

Post a Comment

Previous Post Next Post