विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
हटवांजरी (पोड ) गावात सात महिन्यापासून पाण्याची टंचाई असल्याने ग्रामस्थांची ससेहोलपट होत आहे. ग्रामपंचायतीने या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप हटवांजरी ग्रामवासीयांनी केला आहे. या गावात सार्वजनिक पिण्याची पाण्याची सुविधा नाही. हटवांजरी गावातील समस्येकडे प्रशासनाचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधींचे सुध्दा या समस्येकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. हटवांजरी गावात विकास कामे, शासकीय योजनेचा अभाव,पिण्याचे पाण्याची टंचाई याकडे आता कोण लक्ष देणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. साहेब एकीकडे आजादी का अमृत महोत्सव साजरा होत असतांना मात्र, पाणी सारख्या गंभीर व मुलभूत सुविधाकडे द्यायला हवे तसे लक्ष दिले गेले नाही ? अशा प्रश्न निर्माण होत आहे.
पाणी प्रश्न पेटला
मागील सात महिन्यापासून हटवांजरी (पोड ) येथे पिण्याची पाण्याची टंचाई आहे. या गावात गेल्या सात महिन्या पासून नळ योजनेचे काम सुरु आहे. मात्र उन्हाळा गेला आता पावसाळा आला तरी देखील पाणी मिळेना, त्यामुळे येथील पाणी प्रश्न पेटला आहे. हटवांजरी गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे हटवांजरी गावकऱ्यांनी तात्काळ गावा मध्ये सोयी सुविधा पुरवाव्या अशी मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीने द्यावे लक्ष
ग्रामपंचायतीने सर्व समस्या दूर कराव्या हटवांजरी (पोड ) या गावात अनेक समस्या प्रलंबित आहेत. हटवांजरी गावातील आदिवासिंचा विकास घेवू नये. भोळ्या भाबड्या लोकांची दिशाभूल न करता गावकऱ्यांना किमान मुलभूत सुविधा तरी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून द्यावे अशी येथील मागणी केली आहे.
सात महिन्यापासून पाणी टंचाई
हटवांजरी (पोड ) गावात सात महिन्यापासून पाण्याची टंचाई आहे. ग्रामसेवक यांना वारंवार सूचना देण्यात आली नाही. मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी लक्ष देण्यात रस घेत नाही. हटवांजरी गावात पाण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागत आहे. पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करित असल्याचा आरोप सुनील टेकाम, सौ मीना मेश्राम, मंदा आत्राम, माया आत्राम, कविता टेकाम, संदीप आत्राम , पंचफुला आत्राम , माया बाई मडावी, सरस्वता बाई टेकाम , सुरेश आत्राम, अनुसया कुमरे,
निर्मला आस्वले, नीला बाई आत्राम, अनिता टेकाम,
पाण्याचा प्रश्न पेटला : हटवांजरी पोडातील नागरिकांनी बिडीओ ला केली मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 23, 2022
Rating:
