Page

वसंतनगर येथे सुमोच्या धडकेत बालिका गंभीर जखमी


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : पांढरकवडाहून वाई,वसंतनगर कडे जाणाऱ्या मार्गांवर चारचाकी वाहनाने धडक दिल्याने १५ वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली. रत्नमाला पुणाजी मेश्राम (१५) रा. वागधरा ता.मारेगाव रोड असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना (ता.२) मे रोजी सोमवारला सहा वाजता सुमारास घडली.

सविस्तर असे की, रत्नमाला ही गावाशेजारी बकऱ्या चारत होती. दरम्यान,पांढरकवडाहुन टाटा सुमो गोल्ड कंपनीचे वाहन क्रमांक एम. एच. ३४ ए व्ही ९५४५ या भरधाव येणाऱ्या वाहनाने गजानन राजुरकर यांच्या शेताजवळ जोरदार धडक दिली, या धडकेत १५ वर्षीय बालिका गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ नागरीकांनी उपचारासाठी उमरी येथील येशू ख्रिस्त रूग्णालयात दाखल केले. तूर्तास रत्नमालाचे दोन्ही पाय फॅक्चर असल्याची माहिती आहे.
या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच  घटनास्थळी दाखल झाली व घटनास्थळावरून वाहन चालकासह चारचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले.

सदर घटनेचा अधिक तपास पोलिस करित आहे.