टॉप बातम्या

मच्छिन्द्रा वासियांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : शासनाच्या विविध योजनेतून तालुक्यातील अनेक गावात आरओ बसविण्यात आले आहेत. त्यातील बहुतांश गावातील आरओ मशीन सुरु पण आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मच्छिन्द्रा येथील आरओ फिल्टर मशीन धुळखात आहे.
प्राप्त माहितीनुसार मच्छिन्द्रा येथील जि प शाळेच्या बाजूला दोन वर्षांपूर्वी आमदार निधी अंतर्गत एक आरओ प्लांट बसविण्यात आला. परंतु दोन वर्षे लोटूनही अजून पर्यंत शुद्ध पाणी जनतेला मिळाले नाही. त्यामुळे शासनाला लाखों रुपयाचा चुना लावला आहे. तर ठेकेदार आपली झोळी भरून गायब झाला आहे. याकडे ग्रामपंचायत, प्रशासन, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनधिंचे हेतूपूरस्पर दुर्लक्ष होत असल्याची ओरड ग्रामस्थ करीत आहे.
 वाटर आरओ प्लांट ची वारंटी संपत आहे. आरओ प्लांट लावणाऱ्या कंपनीच्या टेक्निशियनने अजून पर्यंत प्लांटकडे ढुंकूनही पहिले पहिले नसल्याची महिला वर्गातून ओरड होत आहे.

विशेष म्हणजे उद्यापासून शाळा सुरु होत, जि प शाळेच्या बाजूला तसेच माजी सरपंच यांच्या घरासमोर व समाजमंदिर अशा त्रिकुट असलेल्या ठिकाणी उभारलेल्या आरओ प्लांटला सुरु करण्याकरिता कोणीच पुढाकार का? घेत नाही असा प्रश्न उपस्थित सर्व सामान्यांतून होत आहे.
Previous Post Next Post