टॉप बातम्या

तलाठी विनोद खोब्रागडेंनी केले शेतकऱ्यांना सातबाराचे घरपाेच वाटप

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 

वरोरा : स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महाेत्सवी निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील वराेरा उपविभागाचे तलाठी विनाेद खाेब्रागडे यांनी आपल्या साजातील वराेरा व वरोरा कॉलरी भागातील कास्तकारांना नुकतेच माेफत डिजीटल सातबाराचे वाटप केले. आता पावेताे शासनाच्या एका विशेष माेहिमे अंतर्गत त्यांनी कास्तकांना २६० सातबाराचे वितरण केले असल्याचे आज आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले.

शासकीय वसूलीही त्यांची या वर्षातील उल्लेखनिय असुन उपराेक्त सातबारा वाटपाचे काम ते वराेरा चे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार राेशन मकवाने, नायब तहसीलदार मधुकर काळे, ना.त.वाकचाैरे व मंडळ अधिकारी विलास काळे यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहे.
या सातबारा वाटप कार्यक्रमात त्यांना शेतकरी वर्गांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या जिल्ह्यात सातबारा वाटपाची ही माेहिम जाेरात सुरु असल्याचे समजते.
Previous Post Next Post