शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती संपन्न

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे
वणी, (२ आक्टो.) : शिक्षण प्रसारक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणी येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती संपन्न झाली.

या वेळी विद्यालयाचे मुख्यद्यापक श्री प्रमोद क्षीरसागर सर यांनी तसेच विद्यालयाचे उपमुख्याद्यापक श्री तामगाडगे सर यांनी गांधीजींच्या व शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रतिमेचे पूजन केले. या वेळी उपमुख्यद्यापक श्री तामगाडगे सर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला श्री शोभने सर, मालगडे सर, घोडमारे सर, गारघाटे सर, आस्कर सर, देशमुख मॅडम देवाळकर सर तसेच इतर क्षिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लांडे सर यांनी केले तर आभार घोडमारे सर यांनी मानले.