सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२ आक्टो.) : आज शनिवार दि. २ आक्टोंबरला गांधी जयंती निमित्त स्वामी समर्थ योगा क्लास निर्माण नगर तुकुम चंद्रपूरच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ नागरीक संघ तुकुमचे अध्यक्ष बबनराव धर्मपुरीवार यांनी विभूषित केले हाेते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिवाकर राऊतकर भोलाराम सोनुले, रामेश्वर खोडे, गिताताई गटलेवार उपस्थित हाेते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूषाली धर्मपुरीवार यांनी केले तर सदरहु कार्यक्रमाचे संचालन माधुरी बाेडेकर यांनी केले. कार्यक्रमात प्रातिभा रोकडे यांनी मार्गदर्शन केले. स्वागत गीत सरिता गज्जलवार यांनी गायीले. बालसंस्कार गुरुदेव मंडाळाच्या मुलांनी देखील या वेळी एक गीत सादर केले.
ज्योती राऊत, कमला काटपवार, मनिषा गौरकर, मंजुषा निमकर, कविता वरभे, आशा झिंगरे, करूणा खोडे आदीं महिलांनी संयुक्तिकरित्या केले हाेते. या कार्यक्रमाला चंद्रपूरातील याेगप्रेमी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.