खासदार बाळूभाऊ धानोरकरांची मूल नगरीला भेट - नागरिकांनी दिले विविध मागण्यांचे निवेदने

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२ आक्टो) : चंद्रपुर जिल्ह्याचे खासदार बाळुभाऊ धानोरकर काल मूल तालुका दौऱ्यावर आले असता त्यांनी नगर सेविका ललीता सुरेश फुलझेले यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. भेटी दरम्यान उपस्थित नागरिकांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदने सादर केलीत या निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश हाेता.
मूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित जागेवर सभागृह बांधून द्यावे, मुस्लिम समाजासाठी सभागृह बांधून देण्यात यावे, मूल येथील जुन्या नैरोगेज रेल्वे स्टेशन ते रामपुर तलावा लगत चिचोली असलेली रेल्वेची जागा केंद्र सरकार व रेल्वे विभागाशी तातडीने चर्चा करुन नगर परिषद मूलला हस्तांतरित करावी, रेल्वेच्या जागेवर व वनविभागाच्या जागेवर घरे बांधून असलेल्या (झोपडपट्टीत) राहणाऱ्या नागरिकांना पक्के घरे मिळावी. खासदार धानोरकर यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करून आपल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी कांँग्रेसचे नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा भूतपूर्व जि.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत तालुका कांग्रेसचे अध्यक्ष व सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावर, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे सचिव विनोद दत्तात्रय, माजी सभापती वैशाली पुल्लावार, माजी जि.प.सदश मंगला आत्राम, महिला कांग्रेसच्या अध्यक्ष रुपाली संतोषवार, उपसभापती संदीप कारमवार, संचालक अखिल गांगरेड्डीवार, संचालक राजेंद्र कन्नमवार, शांताराम कामडे, डॉ. पद्माकर लेनगुरे, बंडुभाऊ गुरनुले, अन्वर शेख, किशोर घडसे, शेतकरी कांग्रेसचे अध्यक्ष गुरुदास चौधरी, विवेक मुत्यालवार, राजू वाढई, कृष्णा सुरमवार, चंद्रकांत चतारे कांग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील शेरकी, कार्याध्यक्ष कैलास चलाख, नगर सेविका ललिता फुलझेले, सुरेश फुलझेले, शहरह उपाध्यक्ष संदीप मोहबे आदीं उपस्थित हाेते.