टॉप बातम्या

केळापूर तालुका प्रेस क्लब तर्फे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांचा निरोप समारंभ

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१७ ऑक्टो.) : पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये रामकृष्ण महल्ले यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये केळापूर तालुका प्रेस क्लब तर्फे पोलीस निरीक्षक श्री.रामकृष्ण महल्ले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रामकृष्ण महल्ले यांची बदली यवतमाळ जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्ष मध्ये करण्यात आली. त्यावेळी केळापूर तालुका प्रेस क्लब तर्फे रामकृष्ण महल्ले यांना शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी केळापूर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश अनमुलवार, कार्याध्यक्ष विशाल मग्गीडवार, उपाध्यक्ष शेख युनुस, सचिव रवि वल्लमवार, अश्फाक खान, बाळा सस्ते, अतिक शेख, सुरज बंडीवर, विराग नेमनवार, निखिल बेले, नितीन बाराहाते तसेच कार्यक्रमात उपस्थित पोलीस पाटील वर्ग तसेच पोलिस कर्मचारी व व्यापारी वर्ग उपस्थित होते.
Previous Post Next Post