टॉप बातम्या

बारड येथे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांचा पुण्यस्मरण दिन साजरा

सह्याद्री न्यूज | अमोल टेकले 
मुदखेड, (२० सप्टें.) : बारड येथील राजराजेश्वर शिवालय मंदीरात राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दीन विरशैव समाजबांधवा कडून साजरा करण्यात आला डॉ शिवलिंग शिवाचार्य यांच्या प्रतिमेचे पुजन पुष्पहार अर्पण करुन सामुहिक महाआरती करण्यात आली
कोरोना नियमावलीचे पालन करत  
महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
तर यावेळी राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जीवन चरित्रावर स्मरण करण्यात आले शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी सर्व धर्मीय समाजासाठी मानव कल्याणकारी कार्य तसेच जीवन जगण्याची दिशा समाजाला देण्यात आयुष्य समर्पित केले आहे.


यावेळी वीरशैव समाज संघटनेकडून राष्ट्रसंत अहमदपूरकर महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे. अशी सामूहिक मागणी केली आहे. 
कार्यक्रमास श्रीराम कोरे,दीलीपराव कोरे,संजय मुलंगे,सारंग स्वामी, बाळु स्वामी,माधव भिमेवार,प्रभाकर भिमेवार,काशीनाथ मुलंगे, वसंत लालमे,जीवन भिमेवार,मारोती बिचेवार, प्रमेश्वर भिमेवार,प्रमेश्वर अंतेवार,संतोष एमले, नामदेव बिचेवार,बालाजी आम्रे,यशवंत लोमटे, शिवप्रसाद कराळे, प्रमेश्वर एमले, विनोद कोरे,सदाशिव तांडे,प्रमेश्वर भिमेवार, बाबुराव बिचेवार,रामेश्वर धुडकेवार,शंकर लाहेवार, बालाजी कत्रे, मुंजाजी कत्रे, आदीसह समाजबांधव उपस्थित होते.
Previous Post Next Post